NZ vs PAK 1st T20 Highlights: न्यूझीलंड आणि पाकिस्तान (NZ vs PAK) यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच 12 जानेवारी रोजी ऑकलंडमधील ईडन पार्क येथे खेळवला गेला. या रोमांचक सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 46 धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आगामी टी-20 विश्वचषक पाहता ही मालिका खूप महत्त्वाची मानली जात आहे. तत्तपुर्वी, पाकिस्तानचा कर्णधार शाहीन शाह आफ्रिदीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाने 20 षटकात 8 गडी गमावून 226 धावा केल्या. न्यूझीलंडसाठी स्टार अष्टपैलू डॅरिल मिशेलने सर्वाधिक 61 धावांची खेळी खेळली. पाकिस्तानकडून कर्णधार शाहीन आफ्रिदी आणि युवा वेगवान गोलंदाज अब्बास आफ्रिदीने प्रत्येकी सर्वाधिक तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ 18 षटकांत केवळ 180 धावांवरच मर्यादित राहिला. पाकिस्तानकडून बाबर आझमने सर्वाधिक 57 धावा केल्या. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. (हे देखील वाचा: Iftikhar Ahmed Moye-Moye: बाबर आझमनंतर इफ्तिखार अहमदनेही सोडला सोपा झेल, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)