ICC महिला क्रिकेट विश्वचषक (Women's World Cup) 2022 चा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंड  (England) यांच्यात रविवारी, 3 एप्रिल रोजी क्राइस्टचर्चच्या हॅगली ओव्हल येथे, खेळला जाणार आहे. यादरम्यान जागतिक क्रिकेट इतिहासातील अशी पहिलीच घटना घटणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड महिला विश्वचषक फायनल सामन्यात चार महिला मॅच अधिकारी असतील. विजेतेपदाच्या लढतीत चार महिला मॅच अधिकारी असतील - जागतिक खेळातील अशी पहिलीच घटना असेल. दक्षिण आफ्रिकेच्या लॉरेन एजेनबॅग आणि न्यूझीलंडच्या किम कॉटन यांना दोन मैदानी पंच म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, तर वेस्ट इंडिजच्या जॅकलिन विल्यम्स टीव्ही अंपायर असतील. भारताच्या जीएस लक्ष्मी या फायनलसाठी मॅच रेफ्री असतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)