ICC Women's World Cup 2022: महिला विश्वचषकाच्या (Women's World Cup) 24व्या सामन्यात इंग्लंडने (England) पाकिस्तानचा (Pakistan) एकतर्फी 9 गडी राखून पराभवाची धूळ चारली. क्राइस्टचर्चमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानी संघ 41.3 षटकांत अवघ्या 105 धावांत गारद झाला, प्रत्युत्तरात इंग्लंडने 19.2 षटकांत एक विकेट गमावून लक्ष्य गाठले. इंग्लंडची सलामीवीर डॅनिएल व्याट (Danielle Wyatt) हिने 68 चेंडूंत 11 चौकारांसह नाबाद 76 धावा करून संघाचा मोठा विजय निश्चित केला. पाकिस्तानवर मोठ्या विजयासह गतविजेता इंग्लंड पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचली असून त्यांनी आता नेट रनरेटच्या आधारे टीम इंडियाला (Team India) पाचव्या क्रमांकावर ढकललं.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)