1 ते 5 जुलै दरम्यान भारत आणि इंग्लंड (INDIA vs ENGLAND) दरम्यान खेळल्या गेलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यांमध्ये भारताचा 7 गडी राखून पराभव झाला. यासह मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. गेल्या वर्षी ही मालिका सुरू झाली होती, पण कोरोनामुळे शेवटचा सामना होऊ शकला नाही. अशा स्थितीत भारताच्या इंग्लंड दौऱ्यावर हा पुन्हा नियोजित सामना खेळवण्यात आला. विराट कोहलीची गेल्या सामन्यातील कामगिरी खूपच निराशाजनक होती. दरम्यान आयसीसीनं नुकतीच कसोटी क्रमवारीका जाहीर केली आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत विराट 6 वर्षांनंतर तो टॉप 10 मधून बाहेर पडला आहे. कसोटी क्रमवारीत कोहली सध्या 714 च्या रेटिंगसह 13 व्या स्थानावर आहे. त्याचबरोबर भारताच्या दोन फलंदाजांचा टॉप 10 मध्ये समावेश आहे. इंग्लंडविरुद्ध दमदार फलंदाजी करणा-या ऋषभ पंतला 5 स्थानांचा फायदा झाला आहे, तर रोहित शर्मा 9व्या स्थानावर आहे.
Tweet
Here are the latest ICC Men's Test rankings :-
Rishabh Pant achieves a career-high ranking, while Jonny Bairstow breaks into the top 10 📈🔥 #RishabhPant #JonnyBairstow #CricketTwitter #icctestrankings pic.twitter.com/khAWDrzgSo
— Sportskeeda (@Sportskeeda) July 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)