SRH vs RR, IPL 2024 Qualifier 2: आयपीएल 2024 (IPL 2024) क्वालिफायर-2 चा सामना शुक्रवारी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स (SRH vs RR) यांच्यात खेळवला जाणार आहे. राजस्थान रॉयल्स संघाने अलीकडेच आरसीबीचा पराभव करून क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला आहे. तर हैदराबादचा संघ क्वालिफायर-1 मध्ये केकेआरकडून हरल्यानंतर येथे पोहोचला आहे. त्यांना अंतिम फेरीत जाण्याची दुसरी संधी मिळाली आहे. आता या सामन्यात राजस्थान किंवा हैदराबाद कोणताही संघ जिंकेल, अंतिम फेरीत केकेआरशी (KKR) सामना होईल. दरम्यान, राजस्थानने नाणेफेक जिंकुन गोलंदांजी निवडली आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदांजीसाठी आलेल्या हैदराबादने राजस्थानसमोर 176 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. हैदराबादसाठी स्टार फलंदाज हेनरिक क्लासेनने सर्वाधिक 50 धावांची खेळी खेळली. राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट आणि आवेश खान यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थानला सहावा धक्का लागला आहे. राजस्थान राॅयल्सचा स्कोर 92/6

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)