IND vs SA, T20 World Cup 2024 Final: भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून T20 विश्वचषक जिंकला आहे. टीम इंडियाने बार्बाडोसच्या ब्रिजटाऊनमध्ये 7 धावांनी सामना जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले. जवळजवळ 17 वर्षांनंतर चॅम्पियन बनण्यात भारताला यश मिळाले आहे. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. त्याच्या गोलंदाजीमुळे संघाला विजयापर्यंत नेण्यास मदत मिळाली. या यशानंतर हार्दिक आणि जय शाह यांनी मिठी मारली हा आनंद साजरा केला. या दोघांच्या गळाभेटीचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 20 षटकात 7 विकेट गमावत 176 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 169 धावाच करू शकला. भारत टी20मध्ये दुसऱ्यांदा चॅम्पियन बनला आहे. यापूर्वी 2007 मध्ये त्याने विजेतेपद पटकावले होते. (हेही वाचा: Rohit Sharma Crying Video: भारताच्या शानदार विजयानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा झाला भावूक, मैदानावर अश्रू झाले अनावर)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)