इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 19 वा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनी मागील सामन्यात विजय मिळवला आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांना आपली विजयी घोडदौड कायम राखायची आहे. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 228 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादसाठी सलामीवीर हॅरी ब्रूकने झटपट खेळी करताना शानदार नाबाद धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक ३ बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाला 20 षटकात 229 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाला 5 वा मोठा झटका बसला. आंद्रे रसेल 3 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघ 143/5 धावा.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)