IND vs AFG 2nd T20I Live Score Update : भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर (Holkar Cricket Stadium, Indore) खेळवला जात आहे. भारतीय संघाने पहिला सामना जिंकून आतापर्यंतच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत आजही अफगाणिस्तानला हरवण्यात भारताला यश आले तर ते मालिका खिशात घालतील. या सामन्यात भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीही (Virat Kohli) संघात पुनरागमन करणार आहे, अशा स्थितीत करोडो चाहत्यांची नजर कोहलीवर आहे. दरम्यान, भारताने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानच्या स्टार फलंदाज गुलबदिन नायबने दमदार अर्धशतक ठोकले आहे. अफगाणिस्तानचा स्कोर 81/3
What a knock by Gulbadin Naib. 🔥
A 28 ball half century against India. pic.twitter.com/O7t0gm93p0
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 14, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)