Delhi Capitals vs Gujarat Titans, 60th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 60 वा सामना आज म्हणजेच 18 मे रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स (DC vs GT) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाईल. या हंगामात आतापर्यंत दोन्ही संघांनी मैदानावर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. शुभमन गिल या हंगामात गुजरात टायटन्सचे नेतृत्व करत आहे. तर, दिल्ली कॅपिटल्सची कमान अक्षर पटेलच्या खांद्यावर आहे. गुजरात टायटन्स संघ सध्या 16 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तर, दिल्ली कॅपिटल्स संघ 13 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघांना आजचा सामना म्हत्वाचा आहे. दरम्यान, गुजरातने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल, समीर रिझवी, केएल राहुल (डब्ल्यू), अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विपराज निगम, कुलदीप यादव, टी नटराजन, मुस्तफिजुर रहमान

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, कागिसो रबाडा, अर्शद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)