आयपीएल 2023 मध्ये, चाहत्यांना दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. यावेळी चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात CSK कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात डेव्हन कॉनवेने सीएसकेसाठी तुफानी फलंदाजी केली. त्याचवेळी अखेरच्या षटकात धोनीनेही शानदार फलंदाजीचा तमाशा सादर करत सर्वांची मने जिंकली. पंजाब किंग्जकडून सॅम करणने 20 वे षटक टाकले. त्याने पहिल्याच चेंडूवर रवींद्र जडेजाला बाद केले. यानंतर अनुभवी महेंद्रसिंग धोनी फलंदाजीला आला. त्यानंतर स्टेडियम धोनी-धोनीच्या नावाने गुंजू लागले. त्यानंतर त्यानेही चाहत्यांना निराश न करता शेवटच्या दोन चेंडूंवर दोन लांब षटकार ठोकले. धोनीने चार चेंडूत 13 धावा केल्या, ज्यात दोन षटकारांचा समावेश होता. त्याने 325 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)