IND vs AUS World Cup 2023: विश्वचषकापूर्वी भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिलला (Shubman Gill) डेंग्यूची लागण झाली होती. त्यांची प्रकृती इतकी बिघडली होती की त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखलही करावे लागले होते. या काळात त्याने पहिले दोन सामनेही गमावले होते. पण मिळालेल्या माहितीनुसार आता भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारताचा स्टार सलामी फलंदाज शुभमन गिल याने सरावाला सुरुवात केली आहे. शुभमन गिल  बुधवारी अहमदाबादमध्ये दाखल झाला. त्यानंतर त्याने आज सरावाला सुरुवात केली आहे. शनिवारी 14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअवर सामना होणार आहे. पाकिस्तानविरोधात शुभमन गिल मैदानात उतरणार का नाही? याकडे सर्वच भारतीय चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)