INDW vs AUSW 2nd T20: भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ (IND vs AUS) यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका (T20 Series) खेळवली जात आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया (Team India) या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. आता सर्वांच्या नजरा दुसऱ्या सामन्याकडे लागल्या आहेत. टीम इंडियाला मालिकेतील दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याची मोठी संधी आहे. या सामन्यातही टीम इंडियाला आपली जुनी लय कायम ठेवायची आहे. दरम्यान, मालिकेतील दुसरा सामना आज नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर (DY Patil Stadium) संध्याकाळी 7.00 वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. हा सामना स्पोर्ट्स 18 वाहिनीवर थेट प्रक्षेपण होणार आहे. त्याच वेळी, चाहते जियो सिनेमाच्या अॅप आणि वेबसाइटवर या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात. (हे दखील वाचा: Cheteshwar Pujara Double Century: चेतेश्वर पुजाराने द्विशतक झळकावल्याने इंग्लंड मालिकेसाठी निवडकर्त्यांचा वाढला ताण, कधीही होऊ शकते भारतीय संघाची घोषणा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)