IND vs ENG: भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या मालिकेत भारताचा स्टार क्रिकेटर चेतेश्वर पुजाराचा (Cheteshwar Pujara) संघात समावेश नव्हता. पुजारा टीम इंडियाच्या संघात नसणे हा मोठा प्रश्न होता. त्यामुळे सोशल मीडियावर चाहते संघ निवडकर्त्यांवर संतापले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात भारताची फलंदाजी खराब झाली. आता पुजाराने रणजी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्रकडून खेळताना द्विशतक झळकावले आहे. रणजी ट्रॉफीमध्ये झारखंडविरुद्ध खेळताना पुजाराने द्विशतक झळकावले आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघ निवड समितीसाठी पुन्हा तणाव वाढला आहे. भारताला इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका या महिन्याच्या 25 जानेवारी ते 29 जानेवारीदरम्यान सुरू होणार आहे. अशा स्थितीत भारतीय संघाची घोषणा केव्हाही होऊ शकते. (हे देखील वाचा: Rinku Singh कसोटी क्रिकेटमध्ये Shreyas Iyer साठी बनू शकतो धोका, टी-20 नंतर वनडे आणि कसोटीत करु शकतो पदार्पण)
पाहा व्हिडिओ
𝗗𝗼𝘂𝗯𝗹𝗲 𝗗𝗲𝗹𝗶𝗴𝗵𝘁 𝗳𝗼𝗿 𝗖𝗵𝗲𝘁𝗲𝘀𝗵𝘄𝗮𝗿 𝗣𝘂𝗷𝗮𝗿𝗮! 💯💯
A spectacular 2⃣0⃣0⃣ in Rajkot from the Saurashtra batter! 👏👏
Follow the match ▶️ https://t.co/xYOBkksyYt#RanjiTrophy | #SAUvJHA | @IDFCFIRSTBank | @saucricket | @cheteshwar1 pic.twitter.com/ofLZSf2qcl
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 7, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)