इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 22वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. 5 वेळचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्सने या मोसमात आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत, त्यापैकी फक्त 1 जिंकला आहे आणि 2 पराभव झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत खेळलेल्या 4 पैकी 2 सामने जिंकले आहेत तर 2 पराभव पत्करले आहेत. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाला पहिला मोठा धक्का बसला. सलामीवीर एन जगदीसन 0 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघाचा स्कोर 15/1.
Match 22. WICKET! 1.5: Jagadeesan Narayan 0(5) ct Hrithik Shokeen b Cameron Green, Kolkata Knight Riders 11/1 https://t.co/CcXVDhfzmi #TATAIPL #MIvKKR #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)