LSG vs SRH, IPL 2024: आज आयपीएल 2024 च्या 57 व्या (IPL 2024) सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी (LSG vs SRH) हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. मागील सामने गमावल्यानंतर दोन्ही संघ येथे आले आहेत. दोन्ही संघांना विजयी मार्गावर परतायचे आहे. प्लेऑफच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांसाठी विजय आवश्यक आहे. दरम्यान, लखनऊने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना लखनऊने हैदराबादला 166 धावांचे लक्ष्य दिले आहे. लखनऊ सुपर जायंट्सकडून आयुष बडोनीने नाबाद 55 धावांची शानदार खेळी खेळली. सनरायझर्स हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने अवघ्या 16 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. सनरायझर्स हैदराबाद संघाची धावसंख्या 107/0 आहे.
Match 57. 6.1: Ayush Badoni to Travis Head 6 runs, Sunrisers Hyderabad 113/0 https://t.co/46Rn0Qxf4Q #TATAIPL #IPL2024 #SRHvLSG
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)