Euro Cup 2024 Live Streaming In India: युरोपियन फुटबॉल क्लब चॅम्पियनशिपची 17 वी आवृत्ती सुरू झाली आहे. जर्मनीत खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेत रोजच रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. यावेळी 24 संघ युरो कप 2024 मध्ये सहभागी होणार आहेत. आज स्वित्झर्लंड आणि जर्मनी यांच्यात युरो चषकाचा 25 वा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री साडेबारा वाजल्यापासून खेळवला जाईल. स्वित्झर्लंड आणि जर्मनी यांच्यातील हेड-टू-हेड रेकॉर्ड पाहिल्यास, दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 52 सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत स्वित्झर्लंडने 9 सामने जिंकले आहेत. जर्मनीने 35 सामने जिंकले आहेत, तर 8 सामने अनिर्णित राहिले आहेत. भारतीय चाहते युरो कप 2024 चे सामने सोनी स्पोर्ट्स टेन 2, सोनी स्पोर्ट्स टेन 2 एचडी, सोनी स्पोर्ट्स टेन 3, सोनी स्पोर्ट्स टेन 3 एचडी, सोनी स्पोर्ट्स टेन 4, सोनी स्पोर्ट्स टेन 4 एचडी, सोनी स्पोर्ट्स टेन 5, वर थेट प्रक्षेपण पाहू शकतात. सोनी स्पोर्ट्स तुम्ही ते टेन 5 एचडी चॅनेलरवर पाहू शकता. याशिवाय या सर्व सामन्यांचे ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लाईव्ह ॲपवर केले जाईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)