England National Cricket Team vs Australia National Cricket Team: कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत संपल्यानंतर, नॉटिंगहॅममध्ये पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होत आहे. जोस बटलरच्या अनुपस्थितीत इंग्लंड संघाची कमान हॅरी ब्रूककडे आहे. मिशेल मार्श ऑस्ट्रेलियाची कमान सांभाळत आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजता सुरू होईल. दरम्यान, इंग्लंडने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्यचा निर्णय घेतला आहे. (हे देखील वाचा: England vs Australia 1st ODI Head to Head Records: पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार चुरशीची लढत, आकडेवारीत कोण आहे सरस? घ्या जाणून)
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, विल जॅक्स, हॅरी ब्रूक (कर्णधार), जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, मॅथ्यू पॉट्स, आदिल रशीद
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श (कर्णधार), स्टीव्हन स्मिथ, कॅमेरॉन ग्रीन, मार्नस लॅबुशेन, ॲलेक्स केरी (विकेटकीपर), मॅथ्यू शॉर्ट, आरोन हार्डी, सीन ॲबॉट, बेन ड्वार्शुइस, ॲडम झाम्पा
पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
Jofra back 🙏
Bethell debut 🧢
Batting first 🏏
🏴 #ENGvAUS 🇦🇺 | #EnglandCricket
— England Cricket (@englandcricket) September 19, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)