T20 विश्वचषक 2021 ची सुपर 12 फेरी आज शारजाहमध्ये इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात खेळली गेली. जोस बटलरच्या (101*) पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय शतकाच्या बळावर इंग्लंडने सोमवारी श्रीलंकेसमोर 164 धावांचे लक्ष्य ठेवले. इंग्लंडने निर्धारित 20 षटकांत 4 गडी गमावून 163 धावा केल्या. मात्र शिर्लान्का हे लक्ष्य पूर्ण करू शकली नाही. इंग्लंडने श्रीलंकेचा 26 धावांनी पराभव करत स्पर्धेत सलग चौथा विजय नोंदवला आहे. अशाप्रकारे इंग्लंडने T20 विश्वचषक-2021 च्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. सेमीफायनलमध्ये पोहोचणारा इंग्लंड हा पहिला संघ ठरला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)