DC vs GT, IPL 2024: आयपीएल 2024 चा 40 वा (IPL 2024) सामना बुधवारी दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स (DC vs GT) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर संध्यांकाळी 7.30 वाजता होणार आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या गेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव झाला होता. आता गुजरात टायटन्सविरुद्ध दिल्ली संघाला बॅट आणि बॉल या दोन्ही बाजूंनी चांगला खेळ करावा लागणार आहे. दिल्लीच्या संघाला प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल, तर त्यांना विजयाची घोडदौड कायम राखावी लागेल. दुसरीकडे, गुजरात टायटन्स संघाने 8 सामने खेळताना 4 सामने जिंकण्यात यश मिळवले आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टायटन्सच्या कामगिरीत सातत्याचाही अभाव दिसून आला आहे, पण संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स सामन्याचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण केले जाईल. तर मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर पाहता येईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)