आयपीएल 2023 च्या 34 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा (DC vs SRH) सात धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत नऊ गडी गमावून 144 धावा केल्या. मनीष पांडे आणि अक्षर पटेल यांनी 34-34 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादचा संघ 20 षटकांत 6 गडी गमावून 137 धावाच करू शकला. मयंक अग्रवालने सर्वाधिक 49 धावा केल्या. त्याचवेळी हेनरिक क्लासेनने 19 चेंडूत 31 धावांची खेळी खेळली. पॉइंट टेबलबद्दल बोलायचे झाले तर या विजयासह दिल्लीचे सात सामन्यांत दोन विजय आणि पाच पराभवांसह चार गुण झाले आहेत. संघ अजूनही शेवटच्या म्हणजे 10व्या स्थानावर आहे. त्याचबरोबर हैदराबादनेही सातपैकी दोन सामने जिंकले आहेत. संघ पाचमध्ये पराभूत झाला आहे आणि गुणतालिकेत चार गुणांसह संघ दिल्लीच्या अगदी वर म्हणजेच नवव्या स्थानावर आहे.

 ईथे पहा पॉइंट टेबलची स्थिती

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)