इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 41वा सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज (CSK vs PBKS) यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या होम एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. हा सामना जिंकून CSK संघाला पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वल स्थान गाठायचे आहे. दुसरीकडे पंजाब किंग्ज संघ प्लेऑफमध्ये जाण्याची आशा कायम ठेवू इच्छितो. जरी दोन्ही संघ त्यांच्या मागील सामन्यात हरले आहेत. दोन्ही संघ चांगल्या लयीत दिसत आहेत. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
चेन्नई सुपर किंग्ज: डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, मोईन अली, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), तुषार देशपांडे, महिष टीक्षाना, मथिशा पाथिराना.
पंजाब किंग्ज: शिखर धवन (कर्णधार), अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन, सिकंदर रझा, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करण, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग
🚨 Toss Update 🚨@ChennaiIPL win the toss and elect to bat first against @PunjabKingsIPL
Follow the match ▶️ https://t.co/FS5brqfoVq#TATAIPL | #CSKvPBKS pic.twitter.com/cnA72rMGhg
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)