इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या मोसमाचा अंतिम सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (Chennai Super King vs Gujarat Titans) यांच्यात खेळला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Stadium) दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्स संघाने निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 214 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून साई सुदर्शनने सर्वाधिक 96 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जकडून मथिशा पाथिरानाने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. दरम्यान, दुसरा डाव सुरु झाल्यानंतर पावसाला सुरुवात झाली आणि खेळाला उशीर झाल्याने हा सामना 12.10 वाजता सुरू झाला. आता चेन्नईसमोर डकवर्थ लुईस नियमानुसार 15 षटकात 171 धावांचे लक्ष्य आहे. लक्ष्याचा पाठलाग करता चेन्नईच्या संघाला तिसरा मोठा धक्का बसला आहे. चेन्नईचा स्कोर 149/5
FINAL. WICKET! 12.5: MS Dhoni 0(1) ct David Miller b Mohit Sharma, Chennai Super Kings 149/5 https://t.co/IUkeFQS4Il #Final #TATAIPL #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)