ENG vs PAK: रावळपिंडी कसोटीचा पहिला दिवस पाकिस्तान क्रिकेट संघासाठी (ENG vs PAK) खुप वाईट होता. पाकिस्तानी संघाला त्याच्याच घरात इंग्लड फलंदाजाने अशा प्रकारे धुतले की जग पाहतच राहिले. रावळपिंडी कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने 506 धावा केल्या. मोठी गोष्ट म्हणजे खराब प्रकाशामुळे हा सामना 75 षटकांमध्ये थांबवावा लागला. म्हणजे दिवसात अजून 15 षटके बाकी होती, ती पूर्ण झाली असती तर इंग्लंडची धावसंख्या 600 च्या पुढे जाऊ शकली असती. खेळाच्या पहिल्या दिवशी पाकिस्तानी गोलंदाजांनी अतिशय खराब गोलंदाजी केली पण कुठेतरी रावळपिंडी स्टेडियमची खेळपट्टीही सपाट होती. संघाचे मुख्य प्रशिक्षक सकलेन मुश्ताक (Saqlain Mushtaq) यांनीही हावभावात ही गोष्ट सांगितली.

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)