दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी (IND vs SA) कसोटी संघाची घोषणा होताच. त्यात भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेसह चेतेश्वर पुजाराही (Cheteshwar Pujara) स्थान मिळवू शकला नाही. अशा प्रकारे पुजाराला भारतीय कसोटी संघातून बाहेर ठेवण्यात आले. इंग्लंडच्या कौंटी क्रिकेट क्लब ससेक्सने आता सलग तिसऱ्या सत्रात पुजाराचा संघात समावेश केला आहे. पुजारा 2022 मध्ये पहिल्यांदा ससेक्सकडून खेळताना दिसला होता. यानंतर, पुजारा 2023 आणि आता काउंटीच्या आगामी 2024 हंगामासाठी ससेक्समध्येच राहील. ज्यामध्ये पुजारा काउंटी चॅम्पियनशिपसोबत सामना खेळणार आहे. यावेळी ससेक्समध्ये सहभागी झाल्यानंतर पुजाराने सांगितले की, गेल्या दोन हंगामात मी क्रिकेटचा खूप आनंद लुटला. आता मी ससेक्स कुटुंबात पुन्हा सामील होण्यासाठी खूप उत्सुक आहे. ससेक्सच्या यशात हातभार लावण्यासाठी मीही पूर्णपणे तयार आहे. (हे देखील वाचा: How To Watch IND vs SA 3rd T20 Live Streaming: तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न, कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह?)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)