या वर्षी मार्चपासून इंग्लंडमध्ये असलेल्या चितेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) ससेक्ससाठी अनेक शतके आणि द्विशतके झळकावली आहेत. कौंटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या विभागात पुजाराने 2 द्विशतकांसह एकूण 5 शतके झळकावली होती. या ज्येष्ठ भारतीय फलंदाजाने आता एकदिवसीय स्पर्धेतही आपला जबरदस्त फॉर्म कायम ठेवला आहे. पुजाराने रॉयल लंडन वन डे चषकात सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले. दोन दिवसांपूर्वी पुजाराने वॉरविकशायरविरुद्ध 79 चेंडूत 107 धावा केल्या होत्या.
Tweet
Back to back centuries for @cheteshwar1. 💯 🤩 pic.twitter.com/9F7bMlvvkF
— Sussex Cricket (@SussexCCC) August 14, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)