PBKS vs CSK, IPL 2024: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 53 वा (IPL 2024) सामना पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज (PBKS vs CSK) यांच्यात हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्मशाला येथे खेळवला गेला. या सामन्यात चेन्नईने पंजाबचा 28 धावांनी पराभव केला आहे. तत्तपुर्वी, पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम कुरनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदांजीसाठी आलेल्या चेन्नईने पंजाबसमोर 168 धावांचे लक्ष्य ठेवले. चेन्नई सुपर किंग्जकडून स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने सर्वाधिक 43 धावांची खेळी खेळली. पंजाब किंग्जकडून राहुल चहर आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाबचा संघ 20 षटकात 139 धावा करु शकला. पंजाब किंग्जकडून स्टार फलंदाज प्रभसिमरन सिंगने सर्वाधिक 30 धावा केल्या. चेन्नई सुपर किंगकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक तीन बळी घेतले.
Match 53. Chennai Super Kings Won by 28 Run(s) https://t.co/WxW3UyVxfE #TATAIPL #IPL2024 #PBKSvCSK
— IndianPremierLeague (@IPL) May 5, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)