PBKS vs CSK, IPL 2024: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 53 वा (IPL 2024) सामना पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज (PBKS vs CSK) यांच्यात हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्मशाला येथे खेळवला जात आहे. या मोसमात हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येत आहेत. चेन्नई सुपर किंग्जने या मोसमात 10 सामने खेळले आहेत. या कालावधीत सीएसकेने 5 सामने जिंकले आहेत. संघ 10 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर पंजाब किंग्जने 10 पैकी केवळ 4 सामने जिंकले आहेत. पंजाब किंग्ज 8 गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. दरम्यान, पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम कुरनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदांजीसाठी आलेल्या चेन्नईला चौथा मोठा धक्का लागल आहे. सीएसकेचा स्कोर 75/4
Match 53. WICKET! 8.5: Daryl Mitchell 30(19) lbw Harshal Patel, Chennai Super Kings 75/4 https://t.co/WxW3UyVxfE #TATAIPL #IPL2024 #PBKSvCSK
— IndianPremierLeague (@IPL) May 5, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)