India National Cricket Team vs England National Cricket Team: भारतीय संघ 22 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ आज जाहीर झाला आहे. भारतीय संघ कर्णधार सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली मैदानात उतरताना दिसणार आहे. टी-20 मालिकेतून मोहम्मद शमीचे (Mohammed Shami) भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. तर ऋषभ पंत टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. पंतच्या जागी संजू सॅमसन यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळताना दिसेल. तर ध्रुव जुरेलचा संघात समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी करणारा अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी देखील टी-20 संघाचा भाग आहे. मधल्या फळीतील फलंदाज रियान पराग दुखापतीमुळे संघाचा भाग नाही.
इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (विकेटकीपर).
🚨 𝗡𝗘𝗪𝗦 🚨
Mohammad Shami returns as India’s squad for T20I series against England announced.
All The Details 🔽 #TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank https://t.co/jwI8mMBTqY
— BCCI (@BCCI) January 11, 2025
Mohammed Shami picked for T20 series against England
✍️ @pdevendra https://t.co/UiAnHLLy5F
— Express Sports (@IExpressSports) January 11, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)