आयपीएल 2024 च्या (IPL 2023) आधी, लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) फ्रँचायझीने मोठी खेळी केली आहे. अलीकडेच या संघाने अँडी फ्लॉवरच्या जागी ऑस्ट्रेलियन दिग्गज जस्टिन लँगरची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. आता फ्रँचायझीने आपल्या कोचिंग स्टाफमध्ये आणखी एका अनुभवी खेळाडूचा समावेश केला आहे. लखनौ सुपर जायंट्सने शनिवारी एक घोषणा केली आणि पुढील इंडियन प्रीमियर लीग हंगामासाठी संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून माजी भारतीय फिरकी गोलंदाज श्रीधरन श्रीराम (Sridharan Sriram) यांची नियुक्ती जाहीर केली. ते संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर आणि 'मार्गदर्शक' गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखालील कोचिंग स्टाफमध्ये सामील होतील. या तिघांव्यतिरिक्त लखनौच्या कोचिंग स्टाफमध्ये विजय दहिया (सहाय्यक प्रशिक्षक), प्रवीण तांबे (स्पिन गोलंदाजी प्रशिक्षक), मोर्ने मॉर्केल (वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक) आणि जॉन्टी रोड्स (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक) यांचा समावेश आहे.
S Sriram joins to complete our coaching staff for 2024 💙
Full story 👉 https://t.co/4svdieJytL pic.twitter.com/8EgX2Pg8uP
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) September 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)