BBL Viral Video: ऑस्ट्रेलियात खेळल्या जात असलेल्या टी-20 लीग बिग बॅशमध्ये मेलबर्न स्टार्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात झालेल्या सामन्यात तिसऱ्या पंचाची मोठी चूक दिसून आली. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर दोन्ही संघांमधील सामना खेळला जात होता, ज्यामध्ये सिडनी सिक्सर्सचा फलंदाज जोश फिलिपीविरुद्धच्या रनआऊटच्या निर्णयात तिसऱ्या पंचाने नॉटआऊट देण्याऐवजी चुकून आऊटचे बटण दाबले. यानंतर अंपायरला जणू आपला चुकीचा निर्णय लक्षात आल्याने त्याने लगेच चूक सुधारून नॉट आऊटचा निर्णय दिला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. (हे देखील वाचा: INDW vs AUSW 2nd T20 Live Streaming: ऑस्ट्रेलियाला हारवून भारताला मालिका जिंकण्याची सूवर्ण संधी, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)