West Indies Cricket Team vs Bangladesh National Cricket Team T20I Series 2024: वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यात 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे, ज्यासाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने संघ जाहीर केला आहे. बांगलादेश सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. ज्यात बांगलादेशला 2-0 अशा पराभव स्वीकारवा लागला आहे. 3 टी-20 सामन्यांची मालिका 15 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. यष्टिरक्षक फलंदाज लिटन दासकडे 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेची कमान सोपवण्यात आली आहे. संघाचा नियमित कर्णधार नजमुल हुसेन शांतो सध्या दुखापतीतून सावरत आहे. अशा परिस्थितीत संघाची कमान लिटन दासकडे सोपवण्यात आली आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिकेसाठी बांगलादेशचा संघ 

लिटन कुमार दास (कर्णधार), सौम्या सरकार, तनजी हसन तमीम, परवेझ हुसैन आमोन, अफिफ हुसैन, मेहदी हसन मिराज, झेकर अली अनिक, शमीम हुसेन पटवारी, शेख महेदी हसन, रिशाद हुसेन, नसुम अहमद, तस्किन अहमद, तन्झीम हसन साकीब, हसन महमूद, रिपन मंडोल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)