आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) चा तिसरा सामना मंगळवारी अफगाणिस्तान आणि बांगलादेश (AFG vs BAN) यांच्यात खेळला जात आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनचा T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा 100 वा सामना आहे. या सामन्यात शाकिबच्या संघाने अफगाणिस्तानसमोर विजयासाठी 128 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. संघाने 7 बाद 127 धावा केल्या. बांगलादेशकडून मोसाद्देक हुसेनने नाबाद 48 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमान आणि राशिद खान यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)