विश्वचषकाचा 28 वा सामना बांगलादेश आणि झिम्बाब्वे (BNG vs ZIM) यांच्यात खेळला गेला. रविवारी (30 ऑक्टोबर) ब्रिस्बेनच्या मैदानावर बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 20 षटकांत 7 बाद 150 धावा केल्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ 20 षटकांत 8 बाद 148 धावाच करू शकला. बांगलादेशने हा सामना तीन धावांनी जिंकला. बांगलादेशने गट 2 च्या गुणतालिकेत भारताची बरोबरी केली आहे. या विजयासह बांगलादेशचेही 4 गुण झाले आहेत, मात्र भारताच्या खराब नेट रनरेटमुळे ते दुसऱ्या स्थानावर आहेत.
What a match! 🥵
Bangladesh emerge victorious after a thrilling clash against Zimbabwe!#T20WorldCup | #BANvZIM | 📝https://t.co/Qi8dhfgeEW pic.twitter.com/qayCpqXi0y
— ICC (@ICC) October 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)