TATA IPL 2025 Mega Auction Day 2: इंडियन प्रीमियर लीग 2025 साठी खेळाडूंचा लिलाव सौदी अरेबियातील जेद्दाह येथे सुरू आहे. या मेगा लिलावाचा आज दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी 84 खेळाडूंवर बोली लावल्यानंतर आज 490 खेळाडू लिलावात उतरताना दिसणार आहेत. आतापर्यंत 72 खेळाडू विकले गेले आहेत, त्यामुळे आज जास्तीत जास्त 132 खेळाडू विकले जाऊ शकतात. ऋषभ पंतने लिलावाच्या पहिल्या दिवशी सर्व विक्रम मोडले, जिथे लखनौ सुपर जायंट्सने त्याच्यासाठी 27 कोटी रुपयांची बोली लावली. त्यांच्याशिवाय श्रेयस अय्यरवर 26.75 कोटी रुपये, तर व्यंकटेश अय्यरवर 23.75 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मेगा लिलावासाठी 577 खेळाडूंची निवड करण्यात आली होती. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज संघाने अजमतुल्ला ओमरझाईसाठी बोली लावली. पंजाब किंग्सने अजमतुल्ला उमरझाईला 2.40 कोटींना विकत घेतले. गुजरात टायटन्स संघाने RTM चा पर्याय निवडला नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)