टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 3 धावांनी पराभव करत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने निर्धारित 50 षटकांत आठ गडी गमावून 258 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून फोबी लिचफिल्डने सर्वाधिक 63 धावा केल्या. टीम इंडियाकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला 50 षटकांत 8 विकेट गमावून केवळ 255 धावा करता आल्या. टीम इंडियाकडून रिचा घोषने सर्वाधिक 96 धावांची खेळी खेळली. ऑस्ट्रेलियातर्फे अॅनाबेल सदरलँडने सर्वाधिक तीन बळी घेतले. दोन्ही संघांमधील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 9 जानेवारी रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)