RR vs RCB, IPL 2024 Eliminator: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये (IPL 2024) राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RR vs RCB) यांच्यात एलिमिनेटर सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात पराभूत होणारा संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल. तर, विजेता संघ क्वालिफायर 2 मध्ये सनरायझर्स हैदराबादशी भिडणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात एलिमिनेटर सामना खेळण्याची ही पहिलीच वेळ नाही. 9 वर्षांपूर्वी म्हणजेच 2015 आयपीएलमध्ये दोन्ही संघांमध्ये एलिमिनेटर सामना खेळला गेला होता. त्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सवर 71 धावांनी विजय मिळवला होता. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या बंगळुरूला चौथा मोठा धक्का बसला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा स्कोअर 97/4
ELIMINATOR. WICKET! 12.4: Glenn Maxwell 0(1) ct Dhruv Jurel b Ravichandran Ashwin, Royal Challengers Bengaluru 97/4 https://t.co/b5YGTn7pOL #TheFinalCall #TATAIPL #IPL2024 #RRvRCB
— IndianPremierLeague (@IPL) May 22, 2024
ELIMINATOR. WICKET! 12.3: Cameron Green 27(21) ct Rovman Powell b Ravichandran Ashwin, Royal Challengers Bengaluru 97/3 https://t.co/b5YGTn7pOL #TheFinalCall #TATAIPL #IPL2024 #RRvRCB
— IndianPremierLeague (@IPL) May 22, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)