Anushka Sharma Blows Flying Kisses to Virat Kohli: आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) आपला अप्रतिम फॉर्म कायम ठेवत विराट कोहलीने (Virat Kohli) सलग दुसरे शतक ठोकले आहे. गेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 64 चेंडूत शतक झळकावल्यानंतर गुजरात टायटन्सविरुद्धच्या (RCB vs GT) महत्त्वपूर्ण सामन्यात त्याने 60 चेंडूत शतक झळकावले. आयपीएलच्या इतिहासात त्याने आता ख्रिस गेलला मागे टाकून सर्वाधिक शतके करणारा खेळाडू बनला आहे. यासोबतच दोन सामन्यांमध्ये सलग शतके ठोकणारा तो आयपीएल इतिहासातील तिसरा खेळाडू ठरला. दरम्यान, त्याच्या या शानदार शतकानंतर अनुष्का शर्माने (Anushka Sharma) विराटला फ्लाइंग किस दिले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)