मेगास्टारने T10 क्रिकेट लीगमध्ये प्रवेश केला आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबईची टीम विकत घेतली आहे. हा मेगास्टार आता इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमधील मुंबई संघाचे मालक बनले आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. मुंबईसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. पुढील वर्षी मार्च महिन्यात आयएसपीएल खेळवण्यात येणार आहे. हैदराबाद, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, कोलकाता आणि श्रीनगर असे एकूण 6 संघ या क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणार आहेत. आता अमिताभ बच्चन मुंबईच्या टीमचे मालक झाले आहेत. (हे देखील वाचा: IPL 2024 Auction: आयपीएल 2024 च्या लिलावात 'या' फ्रँचायंझीकडे आहेत सर्वाधिक पैसे, जाणून घ्या कोणत्या संघाचे किती स्लॉट्स आहे रिक्त)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)