Satyajeet Tambe On Ajinkya Rahane: भारताचा माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू अजिंक्य राहणेने नुकताच संगमनेर येथे सहकार महर्षी चषकाच्या निमित्ताने प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी अजिंक्यने संगमनेर तालुक्यातील खेळाडूंना आपला वेळ देत अनुभव शेअर केला. तसेच अंजिक्यचे प्रेरणास्त्रोत खेळाडूंच्या नजरेसमोर असावा या हेतूने 10 वर्षांपूर्वी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात स्टेडियम येथे त्यांचे भव्य पेंटिंग तयार करण्यात आले. यानंतर, आमदार सत्यजित तांबे यांनी ट्विट करुन अजिंक्य राहणेचे आभार मानले. ते म्हणाले-'संगमनेर तालुक्याचे भूषण, ग्रामीण भागातून पुढे येत आपल्या प्रतिभेच्या बळावर देशाचे नेतृत्व करणारे भारतीय संघाचे माजी कर्णधार अजिंक्य रहाणे यांचा प्रवास प्रत्येकासाठीच प्रेरणादायी आहे.' यावर अंजिक्य राहणने म्हटले दादा, मला मदत करायला आणि माझा अनुभव शेअर करायला नेहमीच आनंद होतो.
Always happy to Help and share my experience Dada 🙏
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) January 18, 2025
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)