Viral Video: चीनची मुलगी झाली संगमनेरची सून; राहुल हांडेने थाटामाटात बांधली 'शान यान छांग'ची लग्नगाठ (Watch)
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील राहुल हांडे या तरुणाने संगमनेर महाविद्यालयात योगाचे शिक्षण घेतले. पुढे उत्तम प्रशिक्षक झाल्यानंतर योगशिक्षक म्हणून तो चीनमध्ये काम करू लागला होता.
महाराष्ट्रातील तरुण आणि चीनची मुलगी यांचे प्रेमप्रकरण व लग्नाची चर्चा सोशल मिडियावर सुरु आहे. संगमनेरच्या राहुल हांडे या तरुणाने चीनच्या ‘शान’ नावाच्या मुलीशी लग्नगाठ बांधली आहे. या अनोख्या लग्नाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. योगाच्या माध्यमातून 29 वर्षीय राहुल व 31 वर्षीय शान यांची ओळख झाली व लवकरच या ओळखीचे रुपांतर प्रेम आणि नंतर लग्नात झाले. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील राहुल हा चीनमध्ये योगाचे धडे देण्यासाठी गेला होता, तिथे त्याची भेट शानशी झाली. आता तालुक्यातल्या घारगाव गावातील एका मंगल कार्यालयात या दाम्पत्याचा विवाह सोहळा थाटात पार पडला. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील राहुल हांडे या तरुणाने संगमनेर महाविद्यालयात योगाचे शिक्षण घेतले. पुढे उत्तम प्रशिक्षक झाल्यानंतर योगशिक्षक म्हणून तो चीनमध्ये काम करू लागला होता. राहुल हांडे आणि शान यान छांग यांनी प्रथम चिनी पद्धतीने कोर्ट मॅरेज केले व भारतात आल्यानंतर महाराष्ट्रीयन पद्धतीने त्यांचा विवाह झाला. (हेही वाचा: Foreign Tourist Molested in Jaipur Video: जयपूर मध्ये परदेशी महिलेच्या छेडछाड प्रकरणी ऑटो रिक्षा चालक ताब्यात; व्हिडिओ वायरल)
जे लग्नाला आले त्या सर्वांचे हांडे परिवारातर्फे आभार. pic.twitter.com/UU4l2UX8bK
— Rahul Phatangare (@rahulphatangare) July 4, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 05, 2023 04:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

