महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणूकीमध्ये धक्कादायक निकाल लागले आहेत. एकतर्फी महायुतीच्या बाजूने निकाल लागत असताना आता अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पण या निकालांमध्ये कॉंग्रेस साठी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा पराभव मोठा धक्का आहे. 8 वेळेस आमदार झालेले बाळासाहेब थोरात या विधानसभा निवडणूकीमध्ये पराभूत झाले आहेत. संगमनेर मध्ये बाळासाहेब थोरात यांच्या समोर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून अमोल खाताळ यांना तिकीट देण्यात आले होते. अमोल खाताळांनी बाळासाहेब थोरातांचा पराभव केला आहे.
बाळासाहेब थोरात 1985 पासून सलग विजयी झाले आहेत मात्र यंदाच्या निवडणूकीमध्ये त्यांना पराभावाचा सामना करावा लागला आहे. कॉंग्रेस मधील मवाळ स्वभावाचे ते नेते होते. महाराष्ट्र सरकार मध्ये 16 वर्ष त्यांनी मंत्री म्हणून काम केले आहे. सलग 8 वेळेस यश बघितल्यानंतर यंदा पहिल्यांदाच त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. कॉंग्रेस कार्यकारणी मध्येही बाळासाहेब थोरातांनी काम केले आहे.
: संगमनेरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, बाळासाहेब थोरातांचा पराभव, अमोल खताळ विजयी#balasahebthorat #amolkhtal #MaharashtraElection2024result #news18lokmat #ResultsWithNews18 pic.twitter.com/lfzwRkhd6p
— News18Lokmat (@News18lokmat) November 23, 2024
बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे देखील राजकारणामध्ये आहेत. ते नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विधिमंडळामध्ये प्रतिनिधित्व करतात.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)