एकदिवसीय विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) भारतीय भूमीवर आयोजित केला जाणार आहे आणि आता विश्वचषक सुरू होण्यासाठी काही वेळ शिल्लक आहे. वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 14 ऑक्टोबरला अहमदाबादच्या मैदानावर शानदार सामना रंगणार आहे. यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. आता विश्वचषकापूर्वीच, बीसीसीआयने ने एसबीआय लाइफला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हंगामांसाठी अधिकृत भागीदार बनवले आहे. BCCI ने SBI Life ची पुढील तीन वर्षांसाठी (2023-26) देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हंगामांसाठी अधिकृत भागीदार म्हणून घोषणा केली आहे. SBI ही भारतातील सर्वात मोठ्या विमा कंपन्यांमध्ये गणली जाते. BCCI सोबत SBI चा करार 22 सप्टेंबर 2023 पासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेपासून सुरू होईल. बीसीसीआयचे प्रमुख रॉजर बिन्नी म्हणाले की, बीसीसीआय देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी अधिकृत भागीदार म्हणून घोषित करताना आम्हाला आनंद होत आहे. भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी आम्हाला एक भक्कम भागीदारी निर्माण करायची आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)