IND vs SA ICC T20 World Cup 2024 Final: टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात (IND vs SA T20 World Cup 2024 Final) भारतीय संघाचा सामना दक्षिण आफ्रिकासोबत बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल येथे खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा आयसीसी टी-20 विश्वचषकावर कब्जा केला आहे. भारताच्या या विजयानंतर विराट कोहली पाठोपाठ भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून  निवृत्तीची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या क्रिकेट रेकॉर्डबद्दल बोलायचे तर त्याने भारतासाठी 159 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 32.05 च्या सरासरीने आणि 140.89 च्या स्ट्राईक रेटने 4231 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याच्या नावावर 5 शतके आणि 32 अर्धशतके आहेत. 2007 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा तो एक भाग होता आणि भारतासाठी दोन टी-20 विश्वचषक जिंकणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)