रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादचा (RCB vs SRH) आठ गडी राखून पराभव केला. क्लासेनच्या शतकामुळे हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 186 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीने दोन गडी गमावून 187 धावा केल्या आणि सामना जिंकला. आरसीबीसाठी विराट कोहलीने (Virat Kohli) शतक झळकावले आणि कर्णधार फाफ डुप्लेसिसनेही 71 धावांची खेळी खेळली. दोघांमध्ये 172 धावांची भागीदारी आहे. विराटच्या शतकानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) ट्विट करत विराट कोहलीचे कौतुक केले आहे. सचिनने म्हणाला 'तो कव्हर ड्राइव्ह खेळला तेव्हा पहिल्याच चेंडूपासून विराटचा हा दिवस असेल हे स्पष्ट झाले. विराट आणि फॅफ दोघेही संपूर्ण नियंत्रणात दिसत होते, त्यांनी केवळ अनेक मोठे शॉट्स खेळले नाहीत तर यशस्वी भागीदारी करण्यासाठी विकेट्सच्या दरम्यान चांगले धावले. दोघांनी ज्या प्रकारे फलंदाजी केली त्यासाठी 186 ही मोठी धावसंख्या नव्हती'.
It was evident that this would be Virat’s day from the very first ball when he played that cover drive.
Virat and Faf both looked in total control, they not only played many big shots but also ran rather well between the wickets to build a successful partnership.
186 wasn’t a… pic.twitter.com/YpIFVroZfi
— Sachin Tendulkar (@sachin_rt) May 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)