भारतीय महिला संघाची दिग्गज खेळाडू झुलन गोस्वामी (Jhulan Goswami ) हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा केली आहे. झुलनने लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर इंग्लंडविरुद्ध शेवटचा सामना खेळला, ज्यामध्ये भारतीय संघाने 16 धावांनी विजय मिळवला. झुलनने या सामन्यात 2 बळी घेतले. झुलन गोस्वामीने सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली. तिने निवृत्तीचे पत्र शेअर केले असून, त्यात क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचे दु:ख असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मात्र, भारताकडून खेळण्याचा मला अभिमान असल्याचे तिने म्हटले आहे.
Tweet
Thank you everyone! 🙏🏾 @BCCI @BCCIWomen pic.twitter.com/8TWq8SfxDj
— Jhulan Goswami (@JhulanG10) September 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)