एकदिवसीय विश्वचषकात आज पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK vs NZ) यांच्यात महत्त्वाचा सामना खेळला जात आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तानने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तर न्यूझीलंड संघ प्रथम फलंदाजी करत आहे. या सामन्यात किवी संघाचा कर्णधार केन विल्यमसनने पुनरागमन केले आहे. दुखापतीनंतर पुनरागमन करताच केन विल्यमसनने मोठी कामगिरी करत एक विशेष कामगिरी केली आहे. केन विल्यमसन या सामन्यात चांगली फलंदाजी करत आपले अर्धशतक झळकावले आहे. या सामन्यात 11 धावा करत विल्यमसनने विश्वचषकाच्या इतिहासातील 1000 धावा पूर्ण केल्या. विश्वचषकात 1000 धावा पूर्ण करणारा केन विल्यमसन न्यूझीलंड संघाचा तिसरा फलंदाज ठरला आहे. विल्यमसनने सर्वात जलद 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. केनने 25 सामन्यांच्या 24 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. (हे देखील वाचा: AUS vs ENG ICC World Cup 2023 Live Streaming: आज विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड आमनेसामने, एका क्लिकवर जाणून घ्या कुठे पाहणार सामना)
1000 runs for Kane Williamson in World Cups.
- He is the 3rd Kiwi player to achieve this, one of the greatest in modern Era. pic.twitter.com/ONQwzZgSvQ
— Johns. (@CricCrazyJohns) November 4, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)