आशिया कप 2022 मधील त्यांच्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा खेळत नाही. त्याच्या जागी केएल राहुल संघाचे नेतृत्व करेल. अफगाणिस्तानविरुद्ध भारताने तीन बदल केले आहेत. रोहित शर्मा, युझवेंद्र चहल आणि हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी दीपक चहर, दिनेश कार्तिक आणि अक्षर पटेल यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत : केएल राहुल (क), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुडा, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग
अफगाणिस्तान : हजरतुल्ला झझाई, रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, नजीबुल्ला जद्रान, मोहम्मद नबी (क), करीम जनात, रशीद खान, अजमतुल्ला उमरझाई, मुजीब उर रहमान, फरीद अहमद मलिक, फझलहक फारुकी
Afghanistan have won the toss and elect to bowl first against #TeamIndia
KL Rahul to Captain the team in the absence of Rohit Sharma.
Live - https://t.co/1UkuWxy3Ee #INDvAFG #AsiaCup2022 pic.twitter.com/cgeEN8nJxD
— BCCI (@BCCI) September 8, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)