अफगाणिस्तानचा युवा क्रिकेटर नवीन-उल-हकने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. नवीनने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितले की, तो 2023 च्या विश्वचषक स्पर्धेनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी निवृत्तीचा निर्णय घेऊन नवीनने सर्वांनाच चकित केले आहे. त्याने त्याच्या एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की, तो ODI मधून निवृत्त होत आहे. मात्र टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अफगाणिस्तानकडून खेळत राहीन. नवीन आयपीएल 2023 दरम्यान विराट कोहलीशी भाडंण करून प्रसिद्धीझोतात आला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)