India National Cricket Team vs England National Cricket Team, 1st T20I 2025 Match Live Score Update: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs ENG 1st T20I) यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर (Eden Gardens, Kolkata) खेळला जात आहे. टी-20 मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या (Jos Buttler) खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) करत आहे. तत्तपुर्वी, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाने भारतासमोर 133 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने चांगली सुरुवात केली नंतर मात्र जोफ्रा आर्चरने भारताला चौथ्या षटकात लागोपाठ दोन धक्के दिले. या दोन धक्क्यानंतरही अभिषेक शर्माने आपला आक्रमक खेळ सुूरूच ठेवला. सध्या भारताची धावसंख्या 9.2 षटकांत 98 असून अभिषेक हा 25 चेंडूत 59 धावाकरून खेळत आहे.
पाहा पोस्ट -
𝘼 𝙎𝙩𝙮𝙡𝙞𝙨𝙝 𝙁𝙞𝙛𝙩𝙮 😎
Abhishek Sharma starts the #INDvENG T20I series on the right note 👍
Follow The Match ▶️ https://t.co/4jwTIC5zzs#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/U7Mkaamnfv
— BCCI (@BCCI) January 22, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)