सोशल मीडियावर दररोज कोणता ना कोणता व्हिडिओ व्हायरल होत असतो. सध्या असाच टिकटॉक फेम प्रिया गोलानीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ 2020 मधील आहे मात्र सध्या पुन्हा एकदा तो सोशल मिडियावर शेअर केला जात आहे. यामध्ये दिसत आहे की, प्रिया गोलानी टिकटॉक वर व्हिडीओ बनवण्यासाठी डान्स करत आहे. 'जरा-जरा टच मी टच मी टच मी' या गाण्यावर ती डान्स करत आहे आणि अचानक एक कुत्रा तिच्यावर हल्ला करतो. प्रियाच्या मांडीचा चावा कुत्र्याने घेतला आहे. या हल्ल्यात तीला जखमही झाली आहे. त्यानंतर व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ही तरुणी आपल्या मांडीला झालेल्या जखमेला औषध लावत आहे व एक तरुण तीला 14 इंजेक्शन्स घेण्याचा सल्ला देत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)